खानापूर चित्त्यात श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न
प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:हिंगोली जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथे श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या सप्ताहात जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक कार्यक्रमात भागवतकार ह.भ.प. पंचक महाराज घोडेकर तसेच गाथा पारायण प्रवक्ते ह.भ.प. शेषराव पुतळाजी पवार आणि ह.भ.प. भिवाजी लक्ष्मण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहभर हरिकीर्तन व हरीजागर यांसारखे कार्यक्रम भक्तांच्या मोठ्या सहभागात पार पडले.
या सप्ताहात ह.भ.प. संतोष महाराज साटंबेकर, ह.भ.प. आनंदराज महाराज हातलेकर, ह.भ.प. हनुमान महाराज शिंदे (नाशिक), ह.भ.प. सोपान महाराज पोले गुरुजी, ह.भ.प. गोकुळ महाराज दरेगावकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज खानापूर आणि ह.भ.प. उद्धव महाराज येळेगावकर आदी कीर्तनकारांनी आपले प्रवचन आणि कीर्तन सादर करून वातावरण भक्तिमय केले.
दि. 2 एप्रिल 2026 रोजी गुरुवारी ह.भ.प. महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य व सभापती फकिरा मुंडे , तंटामुक्ती अध्यक्ष मारोतराव जाधव, सुभाष हरिभाऊ जाधव, शिवसेना शाखाध्यक्ष रामचंद्र जाधव, माणिकराव जाधव, मृदंगाचार्य अरुण बुवा कळम कोंडेकर (कुरवाडे) यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राघोजी तुळशीराम पवार यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला विधान डेली न्यूज इंडिया चे मुख्य संपादक सुरेश पाईकराव आणि देश उन्नतीचे पत्रकार अर्जुन पवार यांनीही उपस्थिती दर्शवली.
संपूर्ण सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडत गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.